बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

’75 वर्षात जितकी प्रगती करायला हवी होती तितकी…’, मोहन भागवतांनी केलं मोठं विधान

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील आयोजित एका कार्यक्रमात मोठं विधान करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजवून दिली आहे. स्वार्थीपणा सोडून देशाच्या भल्यासाठी काम करणं अवघड असल्याचं म्हणत त्यांनी गेल्या 75 वर्षात देशाची जितकी प्रगती व्हायला हवी होती, तितकी झाली नसल्याचं मोठं विधान केलं आहे.

दिल्लीमध्ये संत ईश्वर सन्मान 2021 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. देशाला पुढे नेण्याच्या मार्गावर आपण चाललात तरच देश पुढे जाईल, अन्यथा देश पुढे जाणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

श्रीरामाचं उदाहरण देताना, ‘भगवान श्रीरामाच्या नावाचा नारा आपण जोरात लावतो. श्रीराम देव होता असं आपल्याला वाटतं तसेच भरतासारख्या भावावर फक्त देवच प्रेम करू शकतो, असं आपल्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं, त्यामुळे आपण त्या मार्गावर जावू शकत नाही’, असं मोहन भागवतांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, समाजातील विविध घटकांसाठी लढणाऱ्या आणि समाजात निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना दरवर्षी संत ईश्वर सन्मान पुरस्कार देण्यात येतो. याच कार्यक्रमात बोलत असताना सरसंघचालक यांच्या विधानामुळे त्यांना नेमकं काय अधोरेखित करायचं होतं?, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या

“राज्यातील वातावरण भाजपकडून गढुळ केलं जात आहे”

किरीट सोमय्या आज दिल्ली दौऱ्यावर, करणार ‘या’ नेत्यांच्या घोटाळ्याची चौकशी

कंगनाचं पुन्हा वादग्रस्त विधान; शीख समुदायाचा ओढवून घेतला रोष

मलिकांनी ट्विटरवर मध्यरात्री फोडला बाॅम्ब, समीर वानखेडेंचा ‘तो’ फोटो केला शेअर

महाराष्ट्रातील कोरोनाला आला आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More