नागपूर | सरकारी कामांमध्ये आम्ही हस्तक्षेप करतो. पण तो हस्तक्षेप प्रभाव दाखवण्यासाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी करतो, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली आहे. ते नागपुरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे, असा आरोप वारंवार काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष सातत्याने करायचे मात्र भाजप या गोष्टींचा इन्कार करत. मात्र आज सरसंघचालक भागवतांनीच याची स्पष्ट कबुली दिली आहे.
भारतीय जनतेसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी संघाला कधी-कधी हस्तक्षेप करावा लागतो, असं भागवत म्हणाले आहेत.
दरम्यान, सरसंघचालकांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पोलीस मुख्यालयात गळफास घेऊन API ची आत्महत्या; पोलीस दलात खळबळ
-रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड अन् सोशल मीडियावर गदारोळ; फॅन्स म्हणतात…
-काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या ‘त्या’ आमदाराने घेतली 11 कोटींची कार!
-‘ही’ अभिनेत्री उचलणार पूरग्रस्त भागातील 1000 मुलींच्या लग्नाची जबाबदारी
-कौतुकास्पद! गावातील तरूणांनी शहिदाच्या पत्नीला नवं घर दिलं बांधून
Comments are closed.