राम मंदिरासाठी संघ आक्रमक; मोहन भागवतांची अध्यादेश काढण्याची मागणी

मोहन भागवत, सरसंघचालक

नागपूर | देश फक्त कायद्याने नव्हे तर नागरिकांच्या भावनांवरही चालतो, यामुळं सरकारनं राम मंदिरासाठी अध्यादेश काढावा, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच असा पुतळा बांधला जातो तर राम मंदिर का बांधले जात नाही?, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक दत्तात्रेय होसबळे यांनी सरकारला विचारला आहे. ते मुंबईत हुंकार सभेत बोलत होते.

लवकरात लवकर राम मंदिर बनवा, हिंदूंच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, आवश्यक ते सारं काही करा, पण अयोध्येत भव्य राम मंदिराचा मार्ग प्रशस्त करा, असं होसबळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राम मंदिर उभारणीसाठी संघ हळूहळू आक्रमक होताना दिसत आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-वादग्रस्त व्हीडिओ प्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटकेंना पहिला झटका!

-मनोहर जोशींची निवृत्तीची मागणी; उद्धव ठाकरेंचा मात्र नकार

-हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार; योगी आदित्यनाथांचं आश्वासन

-नरेंद्र मोदींना टफ-फाईट; आमदार जितेंद्र आव्हाड बनले चहावाले!

-राज ठाकरेंचा हा व्हीडिओ पाहून तुमची छाती अभिमानानं फुलून येईन!