मुंबई | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रसिद्ध अभिनेता मिथून चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे. याआधीही लखनऊ येथे दोघांची भेट झाली होती. त्यादरम्यान भागवतांना त्यांनी घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत भाजप एका प्रसिद्ध चेहऱ्याच्या शोधात असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबई येथे मिथुन चक्रवर्ती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
लखनऊ येथे झालेल्या भेटीदरम्यान मी भागवतांना मुंबईला आल्यास आवर्जून माझ्या घरी येण्याचा आग्रह धरला होता, त्याच आग्रहाचा मान ठेवत भागवत त्यांनी माझी भेट घेतली, असं मिथुन यांनी सांगितलं.
मिथुनदा हे भाजपच्या दृष्टीने राजकारणातील एक चांगला पर्याय आहे आणि विशेष म्हणजे, त्यांना राजकारणाचा अनुभवही आहे कारण त्यांनी राज्यसभेत खासदार म्हणूनही काम केलं आहे. तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेत खासदार राहिलेले मिथुन चक्रवर्ती यांना 2 वर्षानंतर शारद घोटाळा बाहेर आल्याने आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला होता.
थोडक्यात बातम्या-
आयपीएलच्या लिलावाआधी मोठी घोषणा, ‘या’ संघानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय!
रस्ते वाहतूक मंत्रालयाची मोठी घोषणा, ‘त्या’ वाहनचालकांना आता थेट मिळणार वाहन परवाना!
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम् योजना’; नेमकी काय आहे ही योजना???
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांकडून मंत्रिपदाचा राजीनामा?
प्यार किया तो डरना क्या?, ‘त्या’ दोघींनी त्याची चक्क वाटणी करुन घेतली