बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“धर्मभेद आणि जातीभेद विसरा, सर्वांना बरोबर घेऊन चालणं तेच खरं हिंदुत्व”

सुरत | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. हिंदू धर्म आणि हिंदुत्वाबद्दल मोहन भागवत सतत काही न काही बोलत असतात. अशातच आता मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची व्याख्या सांगताना सर्वांना बरोबर घेऊन चालते तेच खरे हिंदुत्व, असं म्हटलं आहे. सुरतमधील एका मेळाव्यात ते बोलत होते.

हिंदुत्व म्हणजे सर्व लोकांसोबत एकजुटीने चालते ती संस्कृती होय. केवळ पूजा पद्धतीवरून एकमेकांमध्ये भेद करणं चुकीचं आहे. सर्वांना बरोबर घेऊन एकसाथ पुढे चालते तेच खरे हिंदुत्व आहे, अशा शब्दात भागवत यांनी हिंदुत्वाची संकल्पना मांडली आहे.

तसेच सिंधू नदीच्या दक्षिणेला राहतात ते हिंदू म्हणून ओळखले जातात. आपल्या सर्वांनी आता एकत्र उभे राहण्याची गरज आहे. धर्मभेद जातीभेद विसरून आपण सर्वांनी आता एकत्र काम करायला हवं, असं देखील मत मोहन भागवत यांनी यावेळी मांडलं आहे.

दरम्यान, बुधवारी भागवत यांनी सुरत मधील विज्ञान केंद्रात हिंदुत्वावर विचारवंतांच्या मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्याला डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील अशा विविध घटकांतील दीडशेहून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी संघाची हिंदुत्वाबद्दल असणारी व्याख्या सांगितली.

थोडक्यात बातम्या-

गुलाबनंतर आता ‘या’ वादळाचा धोका; महाराष्ट्राला मोठा फटका बसण्याची शक्यता

ही तर आणीबाणीची वेळ, राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा- राज ठाकरे

मॅक्सवेलचा धमाका! बंगळुरूचा राजस्थानवर 7 गडी राखून दणदणीत विजय

मुुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

तालिबान्यांची ISIS विरोधात मोहीम! अफगाणिस्तानमधून इस्लामिक स्टेटची हकालपट्टी करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More