बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारताला पाकिस्तान बनवण्यासाठी 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढवण्यात आली”

गुवाहाटी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मोहन भागवत सध्या आसाम दौऱ्यावर आहेत. आसाम दौऱ्यावर असताना मोहन भागवत यांनी सीए आणि एनआरसी विषयी बोलताना मुस्लिम लोकसंख्या आणि पाकिस्तानवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

आज मोहन भागवत यांनी सीएए-एनआरसीवर लिहिल्या गेलेल्या एका पुस्तकाचं प्रकाशन केलं. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, भारतामध्ये 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिम समुदयाची संख्या वाढवण्यात आली. सिंधसह, बंगाल, आसामला पाकिस्तान बनवण्याची योजना होती. मात्र, ही योजना यशस्वी झाली नाही आणि फक्त पाकिस्तान तयार झालं.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात अल्पसंख्यांकांवर विशेष लक्ष ठेवलं जाईल, असं सांगितल्यापासून भारतात अल्पसंख्यांकांची काळजी घेतली जात आहे. सीएएमुळे कोणत्याच मुस्लिमाचे नुकसान होणार नाही, असं देखील भागवत यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, मोहन भागवत 4 जुलै रोजी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिले होते. यावेळी देखील त्यांनी भारतीयांचा DNA एकच असल्याचं म्हटलं होतं. यानंतर देशभरातून यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या.

थोडक्यात बातम्या – 

सचिन वाझे प्रकरणामुळे वाचला होता राज कुंद्रा; जाणून घ्या वाघे-कुंद्रा केस कनेक्शन!

‘दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या’; अजित पवार मुख्यमंंत्र्यांशी करणार चर्चा

जितेंद्र आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

बोल्ड चित्रपटांची तुलना पॉर्नशी करू नका, राजने मला…’; राज कुंद्राच्या अटकेनंतर गहनाची प्रतिक्रिया

मुलगी 3 महिन्यांपासून बेपत्ता, पोलिसांची उडवाउडवीची उत्तरं; बापानं घेतला गळफास!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More