बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कलह पसरवणाऱ्यांना समाजच सरळ करेल- मोहन भागवत

नागपूर | आपल्या देशातील काही तत्वांमुळे अस्वस्थ वाटत असल्याचं लोक म्हणतात. पण त्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. विद्येमुळे समाजात सकारात्मकता वाढते. तसेच जे कलह पसरवत आहेत त्यांना समाजच सरळ करेल, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

ब्रिटिशांच्या काळापासून देशाने अनुभव घेतला आहे की राजकारणाच्या माध्यमातून लोकांना कायम चिथावणी दिली जाते. प्रत्यक्षात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची स्वात:ची काहीच शक्ती नसते, असं मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. ते नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

समाजात कर्तुत्व, सक्रियता व सकारात्मकतेच्या प्रकाशाचा अभाव असतो आणि त्यामुळे लोकांना देशात अंकारमय वातावरण असल्याचं वाटतं, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या देशात विविधतेत एकता नव्हे तर एकतेची विविधता आहे. सर्व वैविध्यांचा स्वीकार केला तर आपलेपणाच्या भावनेतून हा अंधकारदेखील होतो, असं भागवत यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

“भाजप नेते गोळ्या घालण्यास उकसवत असतात, तेव्हा हे होणारच”

सीएएविरोधात नाटक सादर केल्याने चौथीच्या मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा!

महत्वाच्या बातम्या- 

राज्यात नव्या 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार? अजित पवार म्हणाले…

कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले चहा

मुस्लिमांशी खेळाल तर मोदींना पुन्हा चहा विकावा लागेल- इम्तियाज जलील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More