बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोना महामारीमुळे मोठं नुकसान झालं आहे. या महामारीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि पोलीस खात्यावर मोठा ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून हे संकट उभं राहिलं. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण तिला न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ‘पॉझिटिव्हीटी अनलिमिटेड’ या व्याख्यानमालेदरम्यान ते दिल्लीत बोलत होते.

आपल्याला संकल्पपूर्वक या आव्हानाशी लढायचं आहे. कोरोनावर संपूर्ण विजय मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. देशात पहिली लाट आल्यानंतर डॉक्टर्स दुसऱ्या लाटेचा इशारा देत होते पण आपण सर्वजण, शासन आणि प्रशासनही गाफील राहिलं. त्यामुळेचं आत्ताचं संकट ओढवलं आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा आहे. याच्याशी आपल्याला घाबरायचं नाही तर लढण्याची तयारी करायची आहे. समुद्र मंथनावेळी अमृत प्राप्त होईपर्यंत देवतांनी प्रयत्न केले ते निराश झाले नाहीत. हलाहाल विषालाही ते घाबरले नसल्याचं मोहन भागवत यांनी सांगितलं.

दरम्यान, जे धैर्यवान लोक असतात, ते कायम प्रयत्न सुरूच ठेवतात. आपल्यालाही तसंच करायचं आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावं लागणार आहे. एकमेकांच्या गुणदोषांची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे, असंही मोहन भागवत म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या शरीरात ‘हा’ नवा व्हायरस, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

“पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं”

पोलिसासोबत संबंध ठेवण्यासाठी सराफाची पत्नी करायची असं काही; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

घरजावई असलेल्या पती आणि पत्नीचे रात्री झालं भांडण, सकाळ होताच समोर आला धक्कादायक प्रकार

“अभिनंदन! पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत”

“कोरोना काळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More