बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोहन भागवत कुठले डाॅक्टर हे तपासावं लागेल”

नागपूर | महाराष्ट्राचं राजकारण सध्या आरएसएस, तालिबान, अफगाणिस्तान, काॅंग्रेस, भाजप यांच्या भोवती फिरत आहे. अफगाणिस्तान, तालिबान, जावेद अख्तर या सर्वांमुळे आता राजकारण पेटलेलं आहे. अशात आरएसएस प्रमुख मोहन भागवत एका वक्तव्यामुळे चर्चेत आलेत.

देशात रहाणारे सर्व लोक मग ते हिंदू असेल वा मुस्लीम हे एकच आहेत. हिंदू आणि मुस्लीम यांचा डीएनए हा सारखाचं असल्यांचं वक्तव्य संरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे.

नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अस म्हंटलं की, मोहन भागवत यांचं वक्तव्य हे चुकीचं आहे. मोहन भागवत हे कुठले डाॅक्टर आहेत ते आता तपासावं लागेल, असं म्हणत नाना पटोले यांनी भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. आपला देश हा संविधानावर चालतो हे भागवत यांना महिती नसावं असा, असा टोलाही नाना पटोले यांनी भागवत यांना लगावला आहे.

नाना पटोेले पुढे म्हणाले की, संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे. सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने मांडली आहे. रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्यांचं स्वागत केलं असतं, असं नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

“राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू”

सिद्धार्थ शुक्लाला होतं ‘हे’ व्यसन; लंडनला जाऊन घेणार होता उपचार

भररस्त्यात गाडीवर कपलचे अश्लील चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

“माझा मुलगाही खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळतो”

‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनं खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More