बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोहन डेलकरांच्या कुटुंबियांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

मुंबई | दादरा आणि नगर हवेलीचे तत्कालीन अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनं राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. डेलकर यांना स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिल जात असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या. मोहन डेलकर यांनी आपल्या आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव लिहीलं होतं. मात्र, अशातच डेलकर यांच्या पत्नीसह कुटूंबियांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी आज गुरूवारी शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी डेलकर यांनी प्रवेश केला आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्ये मोहन डेलकरांनी दक्षिण मुंबईमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे अपक्ष खासदार होते. मोहन डेलकर यांच्या निधनामुळं आता दादरा आणि नगर हवेलीमध्ये पोटनिवडणुक होत आहे. आगामी पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेकडून कलाबेन डेलकर उमेदवार असणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, 58 वर्षीय असलेले मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. त्यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणूून निवडून आले होते. डेलकर यांनी आतापर्यंत काँग्रेस, भाजप आणि भारतीय नवशक्ती पक्षाकडून खासदार झाले होते. तसेच डेलकर हे सलग सहावेळ खासदार राहिले होते. मात्र, त्यांनी 2019 साली एकटा नारा देत अपक्ष म्हणून खासदार निवडून आले होते.

थोडक्यात बातम्या –

क्लासी राहुलच्या वादळी खेळीने पंजाबच्या आशा पुन्हा जिंवत; तब्बल ‘इतक्या’ षटकारांची केली आतषबाजी!

वरूण गांधींना मोठा धक्का! शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं कार्यकारिणीतून डच्चू

‘अजित पवारांच्या कंपन्यांवर टाकलेल्या धाडीवरून स्पष्ट होतं की…’; मलिकांचा गंभीर आरोप

“उद्धवजींची बोली अन् बंदुकीची गोळी एकसारखीच, त्यांचा आदेश आला की…”

“पवार घराण्याला महाराष्ट्र लुटायचा काय ठेका दिलाय का?”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More