बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण!

मुंबई | देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. अनेकजण कोरोनाशी दोन हात करत आहेत. यामध्ये दिग्गजांचाही समावेश आहे.

अनेक दिग्दर्शक, अभिनेते कोरोनाशी झुंज देत आहे. आता ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी यांनी स्वत: याची माहिती दिली.

सध्या ते घरीच आयसोलेशनमध्ये असल्याचे कळतंय. घरात राहा आणि सुरक्षित राहा. मी कोरोना पॉझिटीव्ह आहे, अशी इन्स्टास्टोरी मोहन जोशी यांनी शेअर केली आहे. मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतले आहेत.

मोहन जोशी सध्या ‘अग्गंबाई सूनबाई’ या लोकप्रिय मालिकेत काम करत आहेत. मोहन जोशीही शूटींगनिमित्ताने गोव्यात होते. मात्र गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच एंटरटेनमेंट सोसायटी आॅफ गोवाने राज्यात शूटींगची परवानगी नाकारली. यानंतर नुकतीच मालिकेची अख्खी टीम मुंबईला परतली होती.

थोडक्यात बातम्या-

सेल्फीवरुन पतीसोबत झालं भांडण, पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

“चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला माहिती आहे”

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवस लॉकडाउन वाढवला

‘तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल’; एकतर्फी प्रेमातून युवकाची तरूणीकडे शरीरसुखाची मागणी

‘आजी वारल्याचं का सांगितलं नाही?’; तरुणाला दोघा आत्तेभावांकडून जबर मारहाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More