Top News

भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील; मनोहर जोशींचं खळबळजनक विधान

मुंबई | शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील. भाजपसोबत जाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील, असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेना आणि भाजपची गेली 28 वर्ष युती होती. मात्र या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपचं बिनसलं. मात्र मनोहर जोशींनी सेना-भाजप पुन्हा एकत्र येतील, असं विधान केलं आहे. त्यांचं हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेलं जात आहे.

अडीच मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी शिवसेनेने आग्रह धरला होता. भाजप मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत वाटाघाटी करायला तयार नव्हतं. त्यामुळे शिवसेनेने आघाडीसोबत जात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली.

मनोहर जोशींचं हे विधान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात धडकी भरवणारं आहे. तर भाजपला दिलासा देणारं आहे. मात्र शिवसेना आणि विशेषत: उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात, हे महत्वाचं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या