महाराष्ट्र मुंबई

“सरकार आता दाऊदवरील गुन्हेही मागे घेऊन क्लीन चीट देईल”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर भाजपने सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्य सरकारकडून गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु झाला आहे, आता दाऊदला क्लीन चिट मिळणार, अशा आशयाचं ट्विट भाजप मुंबईचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी केलं आहे.

दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आहे आणि लवकरच त्याला महाराष्ट्र सरकारकडून क्लीन चिट मिळू शकेल. कारण सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु झाला आहे. त्वरा करा, मर्यादित दिवस बाकी, अशी बोचरी टीका मोहित भारतीय यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

दरम्यान, मोहित भारतीय यांनी याआधिही एकामागे एक ट्विट करत महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या