नवी दिल्ली | अवघ्या 251 रूपयांमध्ये जगाला स्मार्टफोनचं स्वप्न दाखवणारा उद्योजक मोहित गोयल याला आता नव्या घोटाळ्यासाठी अटक झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोयल चर्चेत आला आहे. यावेळी एका ड्राय फ्रूट घोटाळ्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
ड्राय फ्रूट बिजनेसच्या नावाखाली देशतील विविध भागांत 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप मोहित गोयलवर आहे. नोएडा पोलिसांनी ड्राय फ्रूट घोटाळ्यात व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी त्याला आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना अटक केली आहे.
जवळपास 40 व्यापाऱ्यांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्यानंतर नोएडा पोलिसांनी मोहित गोयलच्या कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला. उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांतून या तक्रारी आल्या होत्या. मोहित या कंपनीचा प्रमोटर होता. दोघे देशभरातून सुका मेवा, डाळ, तेल, मसाले आदी खरेदी करायचे. व्यापारांना वेळेत पैसे देऊन त्यांचा विश्वास संपादन करायचे.
दरम्यान, त्यानंतर मोठमोठ्या ऑर्डर देऊन 40 टक्के रक्कम नेट बँकिंगच्या माध्यमातून आगाऊ भरली जात असे. उर्वरित रक्कम चेकच्या माध्यमातून देण्याचं आश्वासन दिलं जाई. मात्र चेक बँकेत गेल्यानंतर बाऊन्स व्हायचा. फसवणूक जवळपास 500 कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
थोडक्यात बातम्या-
‘…तर मोदी आज आहेत त्यापेक्षा मोठे होतील’; शिवसेनेचा मोदींना सल्ला
मोदी सरकारने दुसऱ्यांचे खांदे भाड्याने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत”
‘तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर….’; रतन टाटांनी आपल्या कामगारांकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा
हिंदू महासभेने सुरू केलेली गोडसे ज्ञानशाळा दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे
सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘या’ गावांना निवडणूक आयोगाचा झटका!