Mohit Kamboj Vs Gajabhau l विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होण्याआधीच राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. कारण आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या एका ट्विटमुळे पुन्हा एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे. मात्र ते ट्विट काय आहे हे पाहुयात…
नेमकं प्रकरण काय? :
भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत ‘गजाभाऊ’ नावाच्या एका अकाऊंटला थेट उचलून आणण्याची धमकी दिली होती. यावेळी माझं पुढचं टार्गेट गजाभाऊ असं म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी @gajabhauX या आयडीला टॅग देखील केलं होतं. त्यानंतर मोहित कंबोज यांना देखील सणसणीत उत्तर मिळालं आहे.
“धरती पे किधर भी होगे , उठा के लाए गे !” असा स्पष्ट इशारा मोहित कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या युजरला दिला होता. याशिवाय हर हर महादेव असं लिहित हे ट्विट सेव्ह करुन ठेवा असं देखील भाजप नेते मोहित कंबोज यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज पुन्हा मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, “एक बात तो साफ हो गई की ‘गजाभाऊ’ किसका पालतू (कुत्र्याचं चिन्ह) हैं”
एक बात तो साफ़ हो गई की @gajabhauX किसका पालतू 🐕 है 🐣
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) December 3, 2024
आज मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटनंतर पुन्हा एकदा गजाभाऊ या युजरकडून मोहित कंबोज यांना चांगलंच उत्तर देण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय की, मला उचलून आलं नाही तर कंबोज नाव बदलणार आहेत.
Mohit Kamboj Vs Gajabhau l ‘गजाभाऊ’ने नेमकं काय म्हटलंय? :
कंबोज ने काल रात्री सांगितला आहे की जर मी गजाभाऊ ला 60 दिवसाच्या आत उचलून आणला नाही तर माझं नाव “मोहित गजाभाऊ गायकवाड”
बापाचं नाव “गजाभाऊ गायकवाड” म्हणून लावणार@mohitkamboj_ https://t.co/93iKg8bhhJ
— गजाभाऊ (@gajabhauX) December 3, 2024
“कंबोज यांनी लिहलंय की, जर मी गजाभाऊ ला 60 दिवसांच्या आत उचलून आणलं नाही, तर माझं नाव “मोहित गजाभाऊ गायकवाड. तसेच बापाचं नाव ‘गजाभाऊ गायकवाड’ म्हणून लावणार.” असं म्हणत गजाभाऊ नावाच्या युजरने ट्विट थेट मोहित कंबोज यांना सुद्धा टॅग केलं आहे. मात्र आता सोशल मिडीयावर रंगलेल्या या वादात अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
News Title – Mohit Kamboj Vs Gajabhau
महत्त्वाच्या बातम्या-
लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव आहे की नाही? अशाप्रकारे चेक करा
एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डाॅक्टरांकडून सर्वात महत्त्वाची अपडेट!
नवीन मुख्यमंत्री कोण होणार? संजय शिरसाट यांनी दिली माहिती
लाडक्या बहिणींनो 2100 रुपये कधीपासून मिळणार?, मोठी अपडेट समोर