नवी दिल्ली | जम्मू काश्मिरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताला घेरण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. मात्र आता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी यांनी पाकिस्तानला कोणाचीही साथ मिळत नसल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे.
आपल्याला कोणाची साथ मिळत नाही. उगीचच मुर्खांच्या स्वर्गात राहू नका. संयुक्त राष्ट्रातही आपल्या बाजूने कोणी उभा राहत नाही. आता आपल्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे, असं मेहमूद कुरेशी यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानी आणि काश्मीरी जनतेने त्यांच्या बाजूने कोणीही उभं नाही हे जाणून घेतले पाहिजे. हा मुद्दा पुढे नेणे फार कठिण आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत हा मुद्दा मांडल्यास रशिया आपल्याला नकार देईल, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-शिवसेना आमदाराचं स्तुत्य पाऊल; पूरग्रस्त गाव घेतलं दत्तक
-विंग कमांडर अभिनंदन यांचा स्वातंत्र्यदिनी ‘वीरचक्र’ने गौरव होणार!
-काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; मांडणार पूरग्रस्तांच्या व्यथा
-राज ठाकरेंच्या ‘होम मिनिस्टर’ पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर!
-“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत… फडणवीस की येडीयुरप्पा???”
Comments are closed.