बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकारात्मक बातमी! सोमवारी देशात मागच्या 100 दिवसातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या संकटात संपूर्ण देश सापडला असताना देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. देशातील नव्या कोरोना बाधितांचे संख्या गेल्या तीन महिन्यात झपाट्याने वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच आता हे रुग्ण संख्या आटोक्यात येत असताना स्पष्ट होत आहे.

भारतातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या 100 दिवसातील सर्वात कमी रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. काल देशभरात 29 हजार 689 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच देशातील कोरोनामुक्तीचा दर हा 98 टक्के एवढा झाला आहे. नव्या बाधितांच्या सक्रिय रूग्णसंख्येतही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात घट होत असताना पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आता सध्या देशभरात 3 लाख 98 हजार 100 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लसीकरणाचा वेग वाढल्याने कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचं बोललं जात आहे.

मागच्या 100 दिवसातील सर्वात कमी सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची नोंद काल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांमध्येही दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिली तर भारत लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

पुरात अडकलेल्या कोरोना रूग्णाच्या मदतीसाठी सरसावले एनडीआरएफचे जवान, पाहा व्हिडीओ

देशाच्या इतिहासात पहिलीच घटना; मतदारांना पैसे वाटल्यानं लोकप्रतिनिधी तुरूंगात

#TokyoOlympics | हाॅकी सामन्यात भारताचा 3-0 ने दणदणीत विजय

पुणे रेल्वे स्थानकाला आज 96 वर्ष पूर्ण!

पेट्रोल डिझेलची कटकट संपणार; आता कोंबड्यापासून तयार होणार बायोडिझेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More