कार्डशिवायही काढता येणार एटीएममधून पैसे, आरबीआयने केली मोठी घोषणा
नवी दिल्ली | एटीएम मशीनमधून पैसे काढायचे म्हटलं की एटीएम कार्ड आवश्यकच आहे. मात्र, आता एटीएम कार्ड शिवाय देखील एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. रिझर्व बँकेचे (RBI) गव्हर्नर शशिकांत दास (Shashikant Das) यांनी शुक्रवारी याबद्दलची महत्त्वाची घोषणा केली आहे.
RBI ने भारतातील सर्व बँकांमधील एटीएममध्ये (ATM) कार्डलेस रक्कम काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव दिला आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआयद्वारे (UPI) ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती दास यांनी दिली आहे.
कार्डलेश कॅश विड्रॉल (Cardless Cash Withdrawal) सुविधा वापरताना बँकेच्या ग्राहकाला एटीएममधून पैसे काढताना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरण्याची आवश्यकता नाही. व्यवहारात प्रत्यक्ष कार्डची गरज नसल्याने कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग अशा प्रकारची फसवणूक टाळण्यास मदत होते.
दरम्यान, कोरोना काळात जेव्हा लोक एटीएममध्ये जाण्यासाठी तयार नव्हते त्यावेळेस ही सुविधा सुरू करण्यात आली होती. ही कार्डलेस कॅश विड्रॉलची सुविधा काही बँकांच्या मर्यादित एटीएममध्ये उपलब्ध आहे.
थोडक्यात बातम्या-
“कर्म याच जन्मात फेडावे लागतात, यातून कोणीच वाचत नाही”
मोठी बातमी! किरीट सोमय्यांना मुंबई पोलिसांचा झटका
मुंबईत पेट्रोल-डिझेलचा उच्चांक, वाचा ताजे दर
शरद पवारांवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री आक्रमक, दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
“शरद पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा”
Comments are closed.