Top News नाशिक महाराष्ट्र

अनैतिक संबंधांमध्ये पैसा ठरला वरचड; प्रियकरानं प्रेयसीचा जीवच घेतला!

नाशिक | तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या म्हसरुळ भागात झालेल्या विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी यासंबंधी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हत्या झालेल्या महिलेचं पूजा आखाडे नाव असून प्रियकरानेच आर्थिक देवाण घेवाण आणि संशयातून हा खून केल्याचं समोर आलं आहे. सागर आणि पूजा यांचे अनैतिक संबंध होते. तसंच याप्रकरणी प्रियकराला पोलिसांनी अटक केलं आहे.

सागरला पैशांची गरज असल्याने पूजाने त्याला 80 हजार रूपये दिले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात काम नसल्यानं सागर ते पैसे परत करु शकला नाही. पूजा वारंवार त्याच्याकडं पैसे मागत असल्यानं रागाच्या भरात त्यानं त्या रात्री पूजाच्या मानेवर, पोटावर चाकूनं सपासप वार करत तिचा खून केला.

दरम्यान, गुरुवारी 20 जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मखमलाबाद रोडवर पूजा आखाडे या महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेत आणि धारदार शस्त्रानं वार केलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला होता.

थोडक्यात बातम्या-

‘आम्हीही याच देशाचे, ओबीसी जनगणनेची आवश्यकता’; पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करून दिली आठवण

सासरवाडीला बोलावत 25 वर्षांच्या जावयाची हत्या

धक्कादायक! शेतमजुरानं केला 2 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

“गळाभेट घेऊन रामाचं नाव घ्या; गळा दाबून नाही”

“पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या