शाहीनबाग आंदोलनाला तापसी, अनुरागने पैसा पुरवला- कंगना रनौत
मुंबई | बॉलिवुडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नु यांच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. पुणे, मुंबई, हैद्राबाद आणि दिल्ली येथिल कार्यालय आणि घर अशा मिळुन एकुण 28 ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. आयकर विभागाला कर चुकवल्याचे पुरावेही हळुहळु मिळत आहेत.
आयकर विभागाच्या या कारवाईनंतर कंगना रनौतने तापसी आणि अनुराग कश्यप यांच्यावर झालेल्या कारवाईचा तपशिल असलेलं आयकर विभागाचं एक पत्र आणि त्यासोबत काही गंभीर आरोप एका ट्विटद्वारे केले आहे. कंगना रनौतने या ट्विटमध्ये तापसी पन्नु आणि अनुराग कश्यप यांचा उल्लेख चोर असा केला आहे.
कंगनाने केलेल्या ट्विटमध्ये तिने हा काळा पैसा शाहीनबाग आणि प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारासाठी वापरण्यात आला होता का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे ही फक्त कर चोरी नसून पैशाचा गैरव्यवहारही यामध्ये असल्याचं तिने बोलून दाखवलं आहे. त्यानंतर एवढा मोठ्या प्रमाणात पैसा यांच्याकडे आला कुठून? आणि तो त्यांनी कुठे पाठवला? अशाप्रकारे तिने तापसी आणि अनुरागवर निशाणा साधला.
कंगनाच्या ट्विटमध्ये तिने असं म्हटलं आहे की, ज्याची भिती चोरांना वाटत असते तो व्यक्ती कोणी साधारण व्यक्ती नसून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. असे कौतुकास्पद उद्गार तिने पंतप्रधानांना उद्देशुन काढले असून अनुराग आणि तापसीला चोर म्हटलं आहे.
संबंधित कारवाई दरम्यान आयकर विभागाला कर चुकवल्याचे सबळ पुरावेही मिळत असल्याने आता तापसी पन्नु आणि अनुराग कश्यप यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलांसोबतचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ
18 नाही तर आता ‘इतक्या’ वर्षापर्यंत करावा लागणार मुलाचा सांभाळ; सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय
फारुख अब्दुल्लांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडिओ
“श्रीराम बोले मै कहाँ बडा, मै तो बीजेपी के मॅनिफेस्टो मे पडा”
खाता खाता धाडकन पडला चिमुरडा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ
Comments are closed.