#Video | पानिपतमधील माकडाला लागलं पेट्रोल पिण्याचं व्यसन

पानिपत | हरियाणातील पानिपतमधील एक माकड तहान लागल्यानंतर पाणी नाही थेट पेट्रोल पित असल्याचा अजब प्रकार समोर आलाय. या माकडाला पेट्रोल पिण्याच व्यसन लागलय.

पानिपत परिसरात गाड्या पार्क केल्यानंतर त्यामधील पेट्रोल गायब होत होते. वाहनचालकांनी अधिक चौकशी केल्यानंतर हा आश्चर्यकारक प्रकार समजला. हे माकड पेट्रोलचा पाईप काढून थेट पित असल्याचं समोर आलंय.

परिसरातील स्थानिक लोकांनी अधिक माहिती घेतली, हे माकड इतर माकडांप्रमाणे शेंगा फळ खात नाही, पण पेट्रोल पितं.