शेतकऱ्यांच्या पोटात आनंद मावेना, मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर

Monsoon | मान्सूनबाबत (Monsoon) आता मोठी अपडेट समोर आली आहे. उन्हाने तापलेल्या धरतीला पावसाळ्यामुळे थंडावा मिळणार आहे. राज्यात लवकरच मान्सून (Monsoon) हजेरी लावणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पोटात आनंद मावेनासा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं. मात्र आता हवामान खात्याने नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला असल्याचं सांगितलं आहे.

यंदा मान्सूनने लवकर हजेरी लावली : 

गेल्या 24 तासांपर्यंत हवामान खात्याने अंदमान निकोबार बेटांवर पाऊस झाल्याचं सांगितलं आहे. मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाला आहे. 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Monsoon)

24 तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुढील आठवड्यापर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे. (Monsoon)

आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली : 

23 मे पासून आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊसाची तीव्रता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अंदमान आणि निकोबार तसेच केरळ येथे आवश्यक पावसाची स्थिती तयार झाली आहे. पूर्वमोसमी पावसाची तयारी झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून हा लवकर दाखल झाला असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत अवकाळी पाऊस हा यंदा कमी झाल्याचं पाहायला मिळाला. यामुळे यंदा पावसाचे प्रमाण हे मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आणि लवकर असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे वेळेआधीच यंदा मान्सूनने केरळमध्ये उपस्थिती दर्शवली आहे.

News Title – Monsoon Arrived At Keral And Andaman News Update

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकार पुन्हा आल्यास ‘हे’ शेअर्स बनणार रॉकेट; पैसे होणार डबल

‘…म्हणून हिंदुंनी 5-5 मुलांना जन्म द्यायला हवा’; देवकीनंदन यांचं वक्तव्य चर्चेत

‘येत्या 4 जून रोजी…’; मनोज जरांगे यांची नवी घोषणा

‘…नाहीतर मी मुख्यमंत्री झालो असतो’; छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे हादरलं! बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षाच्या मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडलं