Rain Update | राज्यातील जनतेसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मान्सूनचं राज्यात आगमन झालं आहे. यामुळे आता राज्यातील जनता सुखावणार आहे. आता राज्यात मान्सूनच्या आगमनाने नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झाले आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. (Monsoon)
नैऋत्य मोसमी पावसाचे (Monsoon) आगमन हे आता रत्नागिरी, सोलापूर आणि मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. राज्यात अखेर नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. राज्यात पावसाचं आगमन होणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
शुभ वार्ता।
नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आज ६ जून रोजी #महाराष्ट्रात आगमन झाले. ते #कोकणातील #रत्नागिरी, #सोलापूर आणि पुढे #मेडक, #भद्राचलम #विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून #इस्लामपूरपर्यंत पोहोचले.
IMD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2024
आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, मध्य कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस (Monsoon) पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Rain Update | मान्सूनपर्व पावसाची दमदार हजेरी
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जमदार हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. याचा शेतपिकांना देखील मोठा फटका बसताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या (Monsoon) सरी सुरू होत्या.
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेनं कहर केला होता. अनेकांना उष्मघाताने नको केलं होतं. काहीजणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शेतपिकांचं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातीस काढणीला आलेल्या केळी पिकांचं नुसकसान झालं आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी चिंतेत असल्याचं बोललं जात आहे.
News Title – Monsoon Arrived Maharashtra News Update
महत्त्वाच्या बातम्या
पदातून मुक्तता करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना अमित शहांचा फोन!
‘लोकसभेतील यशामागे तुमचं अफाट कष्ट अन्..’; उद्धव ठाकरेंनी फोन करत मानले किरण मानेंचे आभार
राज्यातील सर्वात श्रीमंत, गरीब, तरुण व वयोवृद्ध खासदार कोण; जाणून घ्या एका क्लिकवर
नवरा भाजपकडून, घटस्फोटित बायको तृणमूलकडून उभी, पाहा कुणाचा झाला विजय
पवार घराण्याला स्विकारावा लागला तिसरा पराभव, पाहा तिघांची नावं