पावसाळ्यात चिकन-मटण खाताय?, मग ही बातमी वाचाच!

Monsoon Care

Monsoon Care | पावसाळा म्हटलं की चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह टाळता येत नाही. बरेच जण तळलेले किंवा मग नॉन-व्हेज पासून बनवले जाणारे चटकदार पदार्थ खातात. रिमझिम पडणाऱ्या पावसाळ्यात अन्नाची लालसा लक्षणीय प्रमाणात वाढते. मात्र, या काळात शक्यतो असे पदार्थ खाणे टाळावे, असं म्हटलं जातं.

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार तसेच इतर आजार डोके वर काढतात. या काळात असे काही खाद्यपदार्थ आहेत, जे खाणे टाळावे, अन्यथा ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. मुख्यतः Animal Bases म्हणजेच नॉन व्हेज खाद्यपदार्थांपासून दूर राहावे. यामागे कारणेही मोठी आहेत.

पावसाळ्यात Non-Veg खावे की नाही?

पावसाळा या ऋतुमध्ये हवामान अगदी आल्हाददायक असले तरी त्यामुळे विविध संसर्ग आणि आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे या ऋतूत निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. या हंगामात मांस आणि प्राण्यांवर आधारित पदार्थ टाळणे चांगले आहे, यामागील कारणही या लेखात स्पष्ट केले आहे.

अंडी : अंड्यांना साल्मोनेला बॅक्टेरियामुळे दूषित होण्याचा धोका अधिक असतो, ज्याचे जंतू दमट हवामानात वाढतात. पावसाळ्यात अंडी व्यवस्थित साठवली नाहीत तर ती लवकर खराब होण्याची शक्यता असते. यामुळे कच्ची किंवा न शिजवलेली अंडी, मेयॉनीज असे पदार्थ खाणे टाळावे.

लाल मांस : या काळात मटण किंवा इतर लाल मांस खाणे टाळावे किंवा खाताना काळजी घ्यावी. या हंगामातील आर्द्रता ही जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य वातावरण देते. या काळात लाल मांस चुकीच्या पद्धतीने हाताळणे, साठवणे किंवा शिजवणे यामुळे साल्मोनेला आणि लिस्टेरिया सारखे संसर्ग होण्याची शक्यता (Monsoon Care) असते.

सीफूड : कोळंबी, खेकडे आणि ऑयस्टर इत्यादी शेलफिश पावसाळ्यात खाणे टाळायला हवे. शेलफिश हे फिल्टर फीडर असतात. जे प्रदूषित पाण्यातील जीवाणू आणि विषारी पदार्थ जमा करतात, जे पावसाळ्यात अधिक सामान्य असतात. त्यामुळे सीफूड खाणे शक्यतो टाळायला हवे.

दुग्ध उत्पादने : त्याचबरोबर पावसाळ्यात दूध, चीज आणि दही असे पदार्थ योग्य तापमानात साठवून न ठेवल्यास बॅक्टेरिया आणि जंतूंच्या वाढीमुळे ते लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे असे (Monsoon Care) पदार्थ खाताना योग्य काळजी घ्यावी.

News Title-  Monsoon Care

महत्वाच्या बातम्या-

वाहनचालकांना दिलासा! ‘या’ शहरांत पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

अजित पवारांना धक्का! तब्बल ‘इतके’ नेते शरद पवारांच्या संपर्कात?

गुड न्यूज! आज स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर

आज ‘या’ 4 राशींच्या संपत्तीत होणार प्रचंड वाढ!

“मुस्लिम समाजाच्या ‘या’ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका”; मनसे आक्रमक

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .