Monsoon Health Tips | पावसाळ्यामध्ये सतत भिजल्याने तसेच बदलणाऱ्या वातावरणणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या काळात सर्दी, खोकला, ताप असे आजार लगेच होतात. त्यातच लहान मुलांना तर लगेच इन्फेक्शन होऊन जाते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं.
पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर अधिक भर द्यायला हवा. पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणं खूप गरजेचं आहे. रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर तुम्ही अशा व्हायरल आजारांपासून लगेच बरे होऊ शकता.
या लेखात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी (Monsoon Health Tips ) आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा, याबाबत माहिती सांगितली आहे.
‘हे’ आयुर्वेदिक उपाय देतील आराम
आले : पावसाळ्यात आल्याचा चहा घेणे खूप फायद्याचे ठरते.आलं आरोग्यासाठी खूप चांगलं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आल्यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. आल्याचा चहा प्यायल्याने खोकला आणि सर्दी पासून आराम मिळतो.
हळद : बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास लवकर सुरू होतो. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि या सामान्य आजारांपासून आराम मिळवण्यासाठी हळदीचे दूध प्या. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हे संसर्गापासून बचाव करते.
मिरपूड : प्रत्येकाच्या किचनमध्ये काळी मिरी हा (Monsoon Health Tips )पदार्थ असतोच. काळी मिरी अनेक खाद्यपदार्थांमध्ये मसाला म्हणून वापरली जाते. हीच मिरपूड पावसाळ्यात सर्दी-खोकल्यावर खूप आराम देते. सर्दी-खोकला असेल तर काळी मिरी मधासोबत खाल्ल्यास या आजारांपासून सुटका मिळू शकते.
News Title – Monsoon Health Tips
महत्वाच्या बातम्या-
वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणी मोठी अपडेट; शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात
आनंदवार्ता! ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या नवीन दर
“बर्थडे मुबारक हो कप्तान साहब…”; MS धोनीच्या वाढदिवशी सलमान खानची खास पोस्ट
आज ‘या’ राशींच्या धनसंपत्तीत अचानक वाढ होईल!
‘हिट अँड रन’ च्या घटनेने मुंबई हादरली; गाडीखाली चिरडून महिलेचा मृत्यू, चालक फरार