राज्यात मॉन्सून दाखल, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?, हवामान विभागाकडून महत्वाचा सल्ला

Monsoon News | महाराष्ट्रामध्ये मॉन्सून दाखल झाला आहे. राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूरपर्यंत मान्सून पोहोचला आहे. हवामान मान्सूनच्या प्रवासासाठी अतिशय अनुकूल असल्याचं भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी म्हटलंय.

मॉन्सून राज्यात दाखल झाला म्हटल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?, असा प्रश्न पडतो. तर, हवामान विभाग आणि कृषी विभागाकडून याबाबत मोठा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये,असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?

मान्सूनला पुरक असणारी ला निना जुलैच्या आसपास प्रभावी असण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पाऊस नव्हता, जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला.ऑगस्टमध्ये (Monsoon News) पाऊस नव्हता, सप्टेंबरमध्ये पाऊस आला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असं आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

हवामान विभाग कृषी विभागाला याबाबत महत्वाचे सल्ले देत असते. त्यामुळे कृषी विभागाच्या सल्ल्यानुसा आपल्या ठिकाणच्या जमिनीची आर्द्रता बघून, किती पाऊस पडलाय?, पुर्वानुमान बघून,त्याचा अंदाज घेऊन पेरणीचं नियोजन करावं, असं होसाळीकर  (K.S. Hosalikar) यांनी सांगितलंय.

‘या’ भागांना पावसाचा यलो अलर्ट

दरम्यान, पुढच्या तीन ते चार दिवसात मॉन्सून राज्याच्या विविध भागात पोहोचेल. त्यामध्ये मुंबईचा देखील समावेश असणार आहे. तसंच उद्या (9 जून) कोकणात काही (Monsoon News) ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील जिल्हे आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा दिला आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

News Title-  Monsoon News Important advice for farmers

महत्वाच्या बातम्या-

“देवेंद्र फडणवीस पळणारा माणूस नाही, मी निराश झालो असं समजू नका”

मोठी बातमी! बच्चू कडू यांचा महायुतीला धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय

‘अ‍ॅनिमल’ फेम तृप्ती डीमरीने मुंबईत घेतलं आलिशान घर; किंमत कोटींच्या घरात

“वसंत दादांचा नातू निवडून आलाय, त्यामुळे ठाकरेंची..”; विशाल पाटलांचं वक्तव्य चर्चेत

सरकार स्थापनेपूर्वीच सराफा बाजारात तेजी; सोनं महागलं, आता किंमती काय?