Monsoon News Update | राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि उष्णतेने अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. काही भागात उष्णतेचे प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे वन्यजीव तसेच प्राणी, पक्षी यांच्यासाठी मोठी कसोटीच झाली आहे. मात्र अशातच आता मोठी अपडेट आली आहे. केरळमध्ये यंदा लवकरच मान्सून (Monsoon News Update) दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यामुळे आता पावसाची वाट पाहणारा बळीराजा सुखावणार आहे.
गेल्या वर्षी हवामान खात्याने देखील 4 जून रोजी पाऊस येणार असल्याचा हवामान अंदाज वर्तवला होता. मात्र तसं काहीही झालं नाही. याउलट मागील वर्षी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार उशीरा मान्सून (Monsoon News Update) केरळमध्ये दाखल झाला होता. गतवर्षी 4 जून ऐवजी 8 जूनला मान्सूनने हजेरी लावली आहे.
मान्सूनवर एल निनोचा प्रभाव कमकुवत
एल निनोचा प्रभाव मान्सूनवर (Monsoon News Update) होता. मात्र सध्या तो कमकुवत असल्याचं दिसत आहे. भारतीय उपसागरात आता ना निनो सक्रिय झाला आहे. यामुळे यंदा चांगल्या अनुकूल वातावरणासाठी चांगली प्रतिकूल परिस्थिती आहे. दक्षिण उपसागर, अंदमान निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहेत. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला.
महाराष्ट्रात मान्सून दाखल होतोय
महाराष्ट्रात मान्सून (Monsoon News Update) कधी दाखल होतोय. याबाबत माहिती जाणून घेऊया. हिंद महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कमी दाबाचा पट्टा मान्सूनसाठी अनुकूल आहे. यंदा मान्सून 31 मेपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर केरळमधून पुढील 4 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2024 SW Monsoon over Kerala Forecast by IMD:
2024 नैऋत्य मान्सून, 31 मे 2024 रोजी केरळमध्ये येण्याची शक्यता. (मॉडेल त्रुटी +/- 4 दिवसांच्या) pic.twitter.com/37q1mjyoH9
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 15, 2024
हवामान विभागाने मान्सूनसंदर्भातील पहिला अंदाज मागील महिन्यात व्यक्त केला होता. यंदा तब्बल 106 टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.
News Title – Monsoon News Update Manson To Reach Kerala On May 31 IMD Update Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
मौलवी उपचाराच्या नावाखाली करत होता बलात्कार, महिलेचा धक्कादायक दावा
ऐश्वर्या रायचा अपघात, अशा परिस्थितीत दिसल्याने बॅालिवूडमध्ये खळबळ
कमी किमतीत खरेदी करा 6 एअरबॅग असलेल्या आकर्षक कार
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वीजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
“मोदीजी आता कांद्यावर बोला”; मोदीजी म्हणतायेत जय श्रीराम