Top News

राज्यसभेत प्रचंड गदारोळ; खासदाराने सभापतींसमोरच नियम पुस्तक फाडलं

नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. राज्यसभेत सरकारने शेतीशी संबंधित तीन विधेयके सादर केली. त्यामुळे विरोधकांनी सदनात गोंधळ घातला.

कृषीविषयक विधेयकांवरुन राज्यसभेत विरोधीपक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी या विधेयकाला उत्तर दिलं. मात्र यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी उपसभापतींसमोर असलेली नियम पुस्तिका फाडली.

खासदारांनी सीटसमोर असलेले माइकही तोडले. चर्चेदरम्यान काँग्रेसने हे विधेयक म्हणजे शेतकर्‍यांच्या डेथ वॉरंटवर सही करण्यासारखं असल्याचं म्हणत सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

आवाजी मतदानाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, तसेच हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक संमत झाली.

महत्वाच्या बातम्या-

मोदीजी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवतायेत, पण…- राहुल गांधी

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सिरीयस मॅन’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

पोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही- अनिल देशमुख

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

पुढच्या 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या