बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात झाल्यानंतर आज नेमका कोणता मुद्दा गाजणार? 

मुंबई | विधिमंडळ पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळी अधिवेशनाचा कालावधी राज्य सरकारने कमी केला आहे. अधिवेशन 2 दिवसाचं करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी स्वप्नील लोणकर आत्महत्या व ओबीसी आरक्षणाचा इम्पेरिकल डेटा हे विषय चांगलेच गाजले.

राज्य सरकार व विरोधी पक्ष्यांमध्ये अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी चांगलंच रण पेटल्याचं पाहायला मिळालं. आज अधिवेशनाचा दुसरा व शेवटचा दिवस असून आज अधिवेशनात नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा होणार व अधिवेशन कोणत्या मुद्द्यावरून गाजणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, अधिवेशनादरम्यान धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निलंबन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आज अधिवेशनात आक्रमक भूमिका घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आमदारांनी थेट राजभवनात राज्यपाल यांची भेट घेतली व यासंबंधी तक्रार दिली.

निलंबनाची कारवाईही आकसापोटी झाली. तसेच खुर्चीवरून खाली उतरल्यानंतर तालिका अध्यक्ष हे साधारण आमदार असतात त्यामुळे तालिका अध्यक्ष बरोबर गैरवर्तणूक केल्याप्रकरणी कारवाई करणे योग्य नाही असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच पेटणार यात काहीच शंका नाही.

 

थोडक्यात बातम्या – 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More