मॉन्सूनची गती मंदावली, महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा?; IMD कडून महत्वाची अपडेट

Monsoon Update | मॉन्सून गेल्या दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच असल्याचं चित्र आहे. सध्या मॉन्सूनची गती मंदावली आहे. आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे. परंतु, दोन दिवसांपासून मॉन्सूनची गती मंदावली आहे.

अशात हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट समोर आली आहे.राज्यातील एक-दोन जिल्हे वगळता अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. मान्सूनच्या वाटचालीबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे.

येत्या दोन-तीन दिवसात मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार

सध्या मान्सून सिक्कीम आणि ईशान्य भारतामध्ये सक्रीय आहे. दुसरीकडे मध्य भारतात मान्सून मंदावला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये देखील काहीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत मॉन्सून वेगाने वाटचाल करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात सध्या मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही तुरळक भाग वगळता सर्वच ठिकाणी नुसते ढगाळ वातावरण तयार झाले आहे, पण पावसाच्या सरी बरसल्या नाहीयेत. दुसरीकडे (Monsoon Update) मॉन्सून पश्चिम विदर्भात पोहोचला, मात्र पूर्व विदर्भाला अजूनही मॉन्सूनची प्रतिक्षा आहे.

पश्चिम विदर्भाला अजूनही मॉन्सूनची प्रतिक्षा

मॉन्सून मंदावल्याने शेतकरी सध्या चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. अनेक भागात पेरण्या देखील रखडल्याचं चित्र आहे.आता 23 जूनपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागने म्हटलं आहे.

दुसरीकडे आज (18 जून) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह (Monsoon Update) आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

News Title – Monsoon Update 18 June