शेतकऱ्यांनो पेरणी करण्यापुर्वी ही बातमी वाचाच!, नाहीतर बसेल मोठा फटका

Monsoon Update | मान्सूनचं राज्यात आगमन झालं आहे. मान्सूनने कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे व्यापले आहेत. आता लवकरच मान्सून पश्चिम विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ, वाशिम, बुलढाणा , अकोला जिल्ह्यात आज मान्सूनचं आगमन होऊ शकतं, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. यासोबतच विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये

मान्सूनची विदर्भातील आगमनाची स्थिती 15 जून असली तरी यंदा चार दिवस आधी मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अशात (Monsoon Update ) शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना करण्यात आली आहे.

पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, जून महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वत्र समाधानकारक पाऊस पडेल. अशी माहिती IMD कडून मिळाली आहे.कारण, विदर्भात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असलं तरी काही ठिकाणी स्थिती ही सामान्य नाही.

‘या’ ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट

दुसरीकडे मराठवाड्यात पावसाने हजेरी दिली आहे. या भागात मुसळधार पाऊस बरसला आहे. त्यामुळे पेरणींच्या कामाला आता वेग आल्याचं दिसून येतंय. यामुळे शेतकरी देखील सुखावला आहे.

दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस कोकण (Monsoon Update ) गोव्यात, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

News Title : Monsoon Update Imp Advice for farmers

महत्त्वाच्या बातम्या-

‘सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त आहे’, सुप्रिया सुळेंनी वाचून दाखवला समस्यांचा पाढा

सर्वसामान्यांना दणका! कांदा पुन्हा रडवणार, दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

मान्सूनचं राज्यात जोरदार स्वागत, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याला खुनाच्या आरोपाखाली अटक

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक, उपोषण थांबवण्यासाठी शरद पवारांचं मोठं पाऊल