बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या उष्णतेमुळे राज्यातील नागरिक त्रस्त आहेत. उष्णतेपासून थंडावा मिळवण्यासाठी नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावल्याने पावसाची प्रतिज्ञा लांबली आहे. महाराष्ट्रात वेळेआधी मान्सून दाखल होणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. यावेळी मान्सून कमकुवत झाल्याने देशभरात पाऊस कमी पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रवासाला अडथळे निर्माण होत आहेत. अशातच पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पोषक हवामान तयार होऊन 12 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे बळीराजाला पावसाची आणखी वाट पाहावी लागणार आहे.

राज्याचे कृषिमंत्री दादा भूसे यांनी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असं आवाहन केलं आहे. मान्सूनला अनुकूल वातावरण मिळाले तर 12 ते 13 जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने यापुर्वी सात जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यातच नव्या तारखा मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा तसेच सांगली, सोलापूर, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे इस्लामिक देश संतप्त, कुवैतचा भारताला झटका

मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून ‘ही’ दोन नावं ठरली

“…असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही”

मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

“…म्हणून ते गोपीचंद पडळकर सारखा विकृत व्यक्ती पवारांच्या अंगावर सोडतात”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More