बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सज्ज

नवी दिल्ली | आजपासून संसदेत (Parliament of India) पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु होत आहे. रविवारी केंद्र सरकारने विरोधी पक्षांना असंसदीय शब्दांच्या शब्दकोशावरुन झापले. त्यामुळे हे अधिवेशन गाजणार आहे. विरोधी पक्षाला सरकारला कोंडीत पकडण्यासाठी या अधिवेशनात अनेक मुद्दे आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडणे, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आणि अग्निपथ योजना, हे कळीचे मुद्दे ठरणार आहेत.

रविवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक घेतली. यावेळी अन्वेषण आणि तपास यंत्रणांचा (Investigation Agencies) केंद्र सरकार गैरवापर करत असल्याचे विरोधी पक्षांनी एका सुरात म्हटले. तसेच अग्निपथ योजना, महागाई, भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आणि चीनची भारतीय सीमांतर्गत क्षेत्रांत घुसखोरी आदी मुद्दे चर्चेत घेण्यात आले.

आजपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन 12 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या काळात 32 प्रस्ताव आणि बिले सभागृहात चर्चेसाठी येणार आहे. काँग्रेस खासदार आणि राज्यसभेेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले, हे अधिवेशन कमी वेळात होणार आहे. एवढ्या कमी वेळात असंख्य प्रश्न कसे काय मार्गी लावणार, याचे सरकारने उत्तर देणे टाळले.

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वाचे प्रश्न चर्चेसाठी असल्याने ते आदी हातावेगळे करणे महत्वाचे आहे. आम्ही सर्व प्रश्न चर्चेत घेण्यासाठी तयार आहोत. परंतु विरोधी पक्षाला काहीही बोलण्यासाठी नाही आणि नरेंद्र मोदींची (Narendra Modi) देशातील आणि देशाबाहेरील वाढती लोकप्रियता यामुळे ते अधिवेशनात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

देशात कोरोनाची चौथी लाट आली?, धडकी भरवणारी आकडेवारी समोर

‘आता राऊतांनीच जरा शांततेची भूमिका घ्यावी’ -दीपाली सय्यद

‘संजय राऊत मुर्ख माणूस, त्यांनी फक्त…’; राऊतांवर टीका करताना शिरसाटांची जीभ घसरली

पुनित राजकुमारचा शेवटचा चित्रपट ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार, पोस्टर पाहून चाहते भावूक

प्रतिक्षा संपली, रणबीर-आलियाचं ‘केसरीया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More