Top News शेती

अंबानींच्या ॲाफीसवर मोर्चा; बच्चू कडू, राजू शेट्टींसह ‘हे’ दिग्गज नेते होणार सहभागी

मुंबई | केंद्र सरकार शेतकरी हिताविरोधात धोरण राबवत आहे. त्यावरून नवी दिल्लीत आंदोलन पेटलं असतानाच आता 22 डिसेंबरला मुंबईत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा अंबानी – अदानी विरोधात निघणार आहे.

महाराष्ट्राचे राज्यमंत्री आणि शेतकरी नेते यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या मोर्चात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी, शेकापचे जयंत पाटील, हमाल पंचायतचे प्रमुख बाबा आढाव, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर आणि लोक संघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे सहभागी होत आहेत.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले कायदे रद्द करावं आणि खाजगी कंपन्यांच्या ताब्यात शेती जाणं थांबवावी. त्याचप्रमाणे स्वामीनाथन आयोग लागू करून उत्पादन खर्च धरून 50% नफ्यासह शेती पिकांचा हमी भाव जाहीर करावा या प्रमुख मागण्या आहेत.

22 डिसेंबरला दुपारी 12 वाजता मुंबईच्या बांद्राच्या उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून हा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा बांद्रा – कुर्ला संकुलातील अंबानी यांच्या कार्पोरेट हाऊसवर धडकणार आहे. त्यामुळे आता सगळ्या देशाचे लक्ष या मोर्चाकडे लागलंय.

थोडक्यात बातम्या-

सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; ‘या’ मुद्द्यांकडे वेधलं लक्ष!

…तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते?- हसन मुश्रीफ

अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण; नाटकाचे प्रयोग केले रद्द

“करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकारच्या काळात का नाही केली”

OLX पे बेच दो…पंतप्रधान मोदींचं कार्यालय चक्क OLX वर विक्रीला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या