बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबादेत मोर्चा लोकल लोकांनी काढला- पंकजा मुंडे

औरंगाबाद | भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होता मोर्चा काढला होता. पण, हा मोर्चा लोकल लोकांनी काढला होता. मी त्या मोर्च्यात अपेक्षित असते तर नक्की आले असते, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पाण्यासाठी मी काम केलंय. औरंगाबाद नाही, मी जलयुक्त शिवार माध्यमातून राज्यासाठी काम केलंय. मोर्चात मी नसले तरी मी जागृत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. लोकल लोकांनी मोर्चा काढला होता, मी त्या मोर्चात अपेक्षित असते तर नक्की आले असते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

ओबीसी हा प्राण आहे, सगळे समाज प्राण आहे मात्र ओबीसी हा पाठीचा कणा आहे. राज्य सरकारची मानसिकता आरक्षण टिकवून ठेवण्याची नाही, अशी टीका त्यांनी केलीये.

ओबीसी आरक्षणाविना निवडणूक होऊ नये, मध्य प्रदेशनंतर आता तसेच काम आपण केले तर आपल्यालाही आरक्षण मिळेल, राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही हा मोठा गुन्हा आहे. ओबीसी आरक्षणाबाबत धोका झाला आहे, असं त्या म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या- 

‘…तर आताच राजीनामा देतो’; उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य

“मावळे असतात म्हणून राजे असतात, राजांना पक्षांचं वावडं असू नये”

ओबीसी आरक्षणाबाबत दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका!

“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More