बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या कमी करण्यासाठी आता यश येताना दिसत आहे. मात्र आज पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 3,978 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 4,936 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 85 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे. यातील 27 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1379 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 44059 इतकी आहे. आत्तापर्यंत एकूण 6,669 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,59,776 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 20, 277 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात आज राज्यात 63,309 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून 61181 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण 37,30,729 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मन सुन्न करणारी घटना; पतीचा कोरोनामुळे मृत्यू, पत्नीने उचललं मोठं पाऊल

“लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार”

गिरीश भाऊंना राजकारणात जन्माला मी आणलं, म्हणून आज…- एकनाथ खडसे

कोविशिल्ड लस झाली आणखी स्वस्त; अदर पूनावाला यांनी जारी केले नवे दर

…म्हणून मोफत लसीकरणाबाबतचं ते ट्विट डिलीट केलं; आदित्य ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More