बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 479 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 481 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 5 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,41,240 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4667 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16084 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,18,002 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायली हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

‘पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला आणणार’; जयंत पाटलांनी सांगितला मेगा प्लॅन

बाबो! ‘वर्ल्ड आयकाॅन’ एलोन मस्कने एका दिवसात कमावले तब्बल ‘इतके’ हजार कोटी

“भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा नाहीतर, 2 ऑक्टोबरला जलसमाधी घेणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More