बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 546 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 337 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 5 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,49,620 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 5317 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,172 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,25,619 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायली हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

औरंगाबादमधील शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची मदत; तब्बल 7 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

भारत आणि तालिबान एकाच मंचावर; ‘या’ मुद्द्यावर होणार चर्चा

फायनलपूर्वी कोलकाताच्या ‘या’ त्रिमुर्तीनं वाढवलं धोनी ब्रिगेडचं टेन्शन

“भाजपचे वायदे म्हणजे बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात”

महात्मा गांधी आणि सावरकर यांच्या वादात जावेद अख्तरांची उडी, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More