बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

15 लाखापेक्षा जास्त पाहिले गेले ‘या’ तरूणीचे तांडव नृत्य; पाहा अंगावर रोमांच आणणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपल्यातल्या सुप्त कलांना संपूर्ण जगासमोर मांडत असतात. काही अप्रतिम गायक, गायिका असतात तर काही आपल्यातल्या सेन्स ऑफ ह्युमरला कॉमेडीतून चालना देतात. यु ट्युबवर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. असाच एक यु ट्युबवरचा नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

यूट्यूबच्या जगात अनेक सुपरस्टारदेखील आहेत. ज्यांना लाखो-कोटींमध्ये व्ह्यूज मिळतात. अशातच यूट्यूबवर शिरूश्री सेकिया हिचा एक नृत्याचा व्हिडीओ असून यात तिने धमाकेदार नृत्य केलं आहे. डान्सचा हा फॉर्म तांडव आहे.

शिरूश्री सेकिया शिव तांडव स्तोत्रावर तांडव करताना दिसत आहे. शिरूश्री सेकिया हिचे हावभाव आणि नृत्य करण्याचा अंदाज अतिशय भन्नाट आहे. हा व्हिडीओ डान्स अकॅडमीने सादर केला आहे. या नृत्याची कॉन्सेप्ट आणि कोरियोग्राफी दोन्ही शिरूश्री सेकिया हिने केली आहे. हा व्हिडीओ 15 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

दरम्यान, शिरूश्री सेकिया हिच्या या डान्स व्हिडीओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्यानं लिहिलं आहे की, मी पहिल्यांदा कोणाला इतक्या ऊर्जेसह नृत्य करताना पाहत आहे. तांडव हा महत्त्वाचा नृत्यप्रकार आहे. मात्र तो इतर नृत्यप्रकारांच्या तुलनेत फार प्रसिद्ध नाही. तांडव या नृत्यप्रकारात उग्र हावभाव केले जातात. तर, तिच्या नृत्यानं बघणाऱ्यांच्या अंगावर अक्षरक्ष: रोमांच उभे राहिले आहेत.

पाहा व्हिडीओ –

 

थोडक्यात बातम्या –

अजब प्रकार! कोरोना लस घेतल्यानंतर नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या वस्तू अन्…..

ऑनड्यूटी रोमँटिक व्हिडीओ बनवणं पोलीस जोडप्याला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

देशात एका दिवसात सर्वाधिक मृतांची नोंद; नव्या बाधितांची संख्या 1 लाखांच्या आत

चेहरा झाकलेल्या ‘या’ महिलेने तरुणासोबत केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

लॉकडाऊनमुळे ‘हा’ अभिनेता झाला बेरोजगार; पैशांसाठी विकावी लागली आवडती बाईक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More