बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2.5 कोटींहून अधिक लसीकरण झालं, मात्र अचानक एका राजकीय पक्षाला रिअॅक्शन झाली”

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतात कोरोना लसीची विक्रमी नोंद करण्यात आली. आतापर्यंत सर्वात वेगानं लस देण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हिडीओ काॅन्फरन्सिंग माध्यमातून गोव्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

आतापर्यंत सर्वात वेगानं लसीकरण करण्याचं रेकाॅर्ड मोडत प्रधान मोदी यांना ही वाढदिवसाची भेट आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. याशिवाय पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसवर निशाणा साधला म्हटलं की, एका दिवसात 2.5 कोटींहून अधिक लसीकरणानंतर, कोरोना लसींचा दुष्परिणाम म्हणून तापाबद्दल चर्चा होत आहे.

मी पहिल्यांदाच बघतोय की 2.5 कोटींहून अधिक लसीकरण झालं आणि काल रात्री 12 नंतर अचानक एका राजकीय पक्षाला रिअॅक्शन झाली. त्यांना ताप आला यामागे काही लॉजिक असू शकतं का असा प्रश्न उपस्थित डॉक्टरांना विचारत मोदींनी काँग्रेसला नाव न घेता खोचक टोला लगावला.

दरम्यान, मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंड होताना पहायला मिळत आहे. अनेकांनी मोदींवर टीकास्त्रही सोडलं आहे. “शेतकरी विरोधी दिवस”,”कोरोना गैरव्यवस्थापन दिवस” ​​आणि “महागाई दिवस म्हणून साजरा असं अनेक हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाले.

थोडक्यात बातम्या – 

सलग दुसऱ्या दिवशीही अनिल देशमुखांच्या मालमत्तेवर आयकर विभागाची छापेमारी

करुणा शर्मांच्या अडचणींत वाढ, आणखी दोन दिवस रहावं लागणार कोठडीत

‘दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार, त्यानंतर…’; सोमय्यांच्या वक्तव्याने खळबळ

मोठी बातमी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात दाखल

पुढील दोन-तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More