बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गंगेच्या पात्रात 2 हजारपेक्षा जास्त मृतदेह, ‘या’ प्रख्यात वृत्तपत्राचा धक्कादायक दावा

लखनऊ | काही दिवसांपुर्वी बिहारच्या नद्यांमध्ये कोरोना बाधित रूग्णांचे मृतदेह तरंगताना सापडले होते. त्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली होती. उत्तरप्रदेश आणि बिहार सरकार रूग्णांचे आकडे लपवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यानंतर राज्यात कोरोना स्थिती आणखी गंभीर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यातच आता देशातील प्रसिद्ध वृत्तपत्र दैनिक भास्करने धक्कादायक खुलासा केला आहे.

उत्तर प्रदेशातून 1140 किमी वाहणाऱ्या गंगा नदीमधून धक्कादायक चित्र समोर येत आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार उत्तर प्रदेशच्या 27 जिल्ह्यातून वाहणाऱ्या या नदी किनाऱ्यावर 2000 पेक्षा जास्त कोरोनाबाधित लोकांना दफन करण्यात आलं आहे. कन्नोजच्या महादेवी घाटाजवळ एक दोन नाही तर 350 कोरोनाबाधितांना दफन करण्यात आलं आहे.

एवढंच नाही तर, नदीच्या कमी जास्त प्रवाहामुळे काही शव उघडे पडले आहेत तर काही शव नदीत वाहून गेले आहेत. तर काही जण मृतदेहाला गंगा नदीत अंघोळ घालून किनाऱ्यावर दफन करत आहेत. पुर्व उत्तर प्रदेशात ही स्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बिजनौर, मेरठ, मुजफ्फरनगर, बुलंदशहर, हापुड, अलीगढ , कासगंज, संभल, अमरोहा, बदांयू, शाहजहांपुर, हरदोई, फर्रुखाबाद, कन्नौज, कानपुर, उन्नाव, रायबरेली, फतेहपुर, प्रयागराज, प्रतापगढ, भदोही, मिर्जापुर, वाराणसी, चंदौली, गाजीपुर आणि बलिया या गंगा किनाऱ्या असलेल्या गावात जाऊन पडताळणी केली. त्यानंतर हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

आक्रमक हार्दिक पांड्याला भारतीय संघातून डच्चू, समोर आलं ‘हे’ कारण

13 वर्षाच्या मुलाकडून 25 वर्षीय मोठ्या भावाची हत्या; अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

‘धकधक गर्ल’ माधुरीचा 54वा वाढदिवस; जाणून घ्या माधुरी विषयी काही खास गोष्टी

करुणा मुंडेंच्या पुस्तकावरुन वादाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल

गुजरात सरकार आकडे लपवतंय?, 71 दिवसात बनले 1 लाख 23 हजार मृत्यू प्रमाणपत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More