देश

केंद्र सरकार पीएफबाबत ‘हा’ मोठा निर्णय घेणार!

नवी दिल्ली | देशात रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे देशभरातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 40 कोटीहून अधिक कामगारांना ईपीएफओमध्ये स्थान मिळू शकतं.

नव्या वर्षात ईपीएफओला सरकारच्या महत्त्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला लागू करण्यावर लक्ष देऊन सेवांची पूर्तता आणि सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

देशभरामध्ये 40 कोटींहून अधिक असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत. ते कुठल्याही कंपनी किंवा संस्थेच्या वेतन रजिस्टरमध्ये नोंदणीकृत नाहीत. तसेच त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटीसारखे लाभ मिळत नाहीत.

सरकारने या सर्वांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ईपीएफओअंतर्गत आणण्याची योजना आखली आहे. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेंतर्गत नव्या नियुक्त्या करणाऱ्या एम्प्लॉयर्सना सब्सिडी दिली जाईल.ही सब्सिडी कर्मचारी आणि कंपनीकडून दोन वर्षांसाठी करण्यात आलेल्या रिटायरमेंट फंड कॉन्ट्रिब्युशन म्हणजेच पीएफला कव्हर करण्यासाठी असेल.

थोडक्यात बातम्या-

भाजपला मोठा धक्का, ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

“पुढच्या काही महिन्यांमध्ये ठाकरे सरकार कोसळेल”

‘कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलं’; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा

दहावी पास तरुणांना पोस्टात काम करण्याची संधी; पाहा कसा कराल अर्ज!

मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज- कंगणा राणावत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या