50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नकोच – सर्वोच्य न्यायालय

हैदराबाद | सर्वोच्य न्यायालयाने तेलगंणा सरकारला मुस्लीम आरक्षणासंदर्भात मोठा झटका दिला आहे. आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त देता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये 67 टक्के आरक्षण देण्याची मागणी एका याचिकेतर्फे करण्यात आली होती. याप्रकरणी सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे स्पष्ट केलं.

सर्वोच्य न्यायालयानं आरक्षण देण्याची याचीकाकर्त्याची मागणी फेटाळली. तसेच 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण नको, असं म्हटलं आहे.

दरम्यान, यामुळे मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाचं भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांचा गडकरींना प्रेमाचा सल्ला; म्हणाले तब्येतीला सांभाळा…

धक्कादायक! पोलीस निरीक्षक सुबोधकुमार यांना जवानाने गोळी घातली

-…या कारणानं नितीन गडकरींना आली चक्कर !

-मिकाला अटक झाल्याने राखीला रडू कोसळलं; सोडवायला दुबईला जाणार

-‘आंबा’ प्रकरणात संभाजी भिडेंना दिलासा; 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर