Top News मनोरंजन

6 तासांपेक्षा अधिक वेळ सीबीआयद्वारे सुशांतच्या घराची तपासणी

मुंबई | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास आता सीबीआयद्वारे होतोय. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर वेगाने हालचाली होताना दिसून येत आहेत. तर या प्रकरणी आज सीबीआयच्या विशेष टीमने सुशांतच्या वांद्रेतील घराची कसून तपासणी केली. तब्बल 6 तासांपेक्षा जास्त वेळ सीबीआयच्या टीमने घराचा तपास केला.

घराची तपासणी करत असताना संपूर्ण इमारतीचा परिसर, गच्ची यांची पाहणी करत नोंदी घेण्यात आल्या. शिवाय सुशांतच्या आत्महत्येचा प्रसंग पुन्हा बनवून त्याची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे कूपर रूग्णालयातील 14 जूनला ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सीबीआयच्या टीमने शुक्रवारी मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रं घेतली. त्यानुसार शनिवारी सकाळपासून त्यांनी तपासाला गती दिली. तपास करताना फॉरेन्सिक एक्स्पर्टसोबत मदतीला मुंबई पोलिसांचे अधिकारीही उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय करत असलेल्या तपासाचं व्हिडीयो शुटींग घेण्यात आलं आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून सुशांतच्या घरातील प्रत्येक आवश्यक बाबी तसंच गोष्टींची तपासणी केली जात होती. या सर्वांचे अहवाल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘हो…दाऊद इब्राहिम आमच्याच देशात’; अखेर पाकिस्तानने दिली कबूली

“गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल”

भारताचा चीनला आणखी एक झटका; मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पीपीई किट घालून एकनाथ शिंदे यांनी घेतली कोरोनाबाधित शिवसैनिकांची भेट!

“मोदी खोटं बोलत नाही असा एकही दिवस नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या