बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! राज्यातील या जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट???; महिनाभरात 8000 पेक्षा जास्त बालकांना कोरोनाची लागण

अहमदनगर |  राज्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होणार असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. अशातच राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.

राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये जवळपास 8881 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली की काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 77 हजार 929 जणांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये 8881 ही 18 वर्षाखालील मुलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.

18 वर्षाखालील मुलांमध्ये 0 ते एक वयोगटातील 85 मुलांना लागण झाली आहे आणि 2 ते 12 वयोगटातील 2694 मुलं कोरोना पॉझिटीव्ह आहेत.  13 ते 18 मधील 6102 मुलाना कोरोनाची बाधा झाली आहे. एक महिन्यात 8000 पेक्षा जास्त मुलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे नगरमध्ये मुलांसाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान,  दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून देऊ, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! विमान अपघातात ‘टार्झन’ अभिनेता जो लारासह सात जणांचा मृत्यू

सिल्व्हर ओकवर फडणवीस-पवार भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

ऐकावं ते नवलच! चक्क कुत्रा करतोय डोंबाऱ्याचा खेळ, पाहा व्हायरल व्हिडीओ

गुजरातला 1 हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या- अजित पवार

कोरोनामुक्त झालेल्या माय-लेकीचा पाठलाग करत आईवर गँगरेप, मुलगी वाचली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More