बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शंभरपेक्षा जास्त लोकांना अडकवलंय, आता त्यांचा पर्दाफाश मी करणार”

मुंबई | आर्यन खान प्रकरणानानं सध्या राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. हे प्रकरण निवळत नाही तोपर्यंतच दुसरीकडे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले गेले. यातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तर समीर वानखेडेंवर आरोपांची मालिकांच लावली आहे.

नवाब मलिक नवनवीन ट्विट आणि वेगवेगळे गौप्यस्फोट करत समीर वानखेडेंवर निशाणा साधत आहेत. काल पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी तर समीर वानखेडेंवर भरपूर आरोप केले. ‘निष्पाप लोकांना जर कुणी अडकवत असेल, तर त्याविरोधात लढणं हा माझा धर्म आहे. समीर वानखेडेंनी शंभरपेक्षा जास्त लोकांना 26 खोट्या प्रकरणात अटक केली आहे, मी त्यांचा पर्दाफाश करणार आहे.’, असं म्हणत नवाब मलिक यांनी म्हटलं.

पुढे मलिकांनी म्हटलं की, ज्या राज्यामध्ये लोकांना लुबाडलं जात आहे, खंडणी वसूल केली जात आहे, लोकांना तुरुंगात टाकलं जात आहेत, तर त्यांना अडवणं हे माझं काम आहे, माझी जबाबदारी आहे, आणि ते मी पार पाडणार.

दरम्यान, एवढ्या आरोपांमुळे वानखेडेवंवर अटकेची टांगती तलवार आहे. समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांवर ते कायदेशीर उत्तर देणार आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळत चालल्याचं दिसत आहे. आता याप्रकणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

किवींविरूद्ध भारताची मोठी रणनिती! ‘या’ दोन खेळाडूंना संघात संधी मिळण्याची शक्यता

मुंबई पोलिसांना सरकारकडून फक्त 750 रूपयांची दिवाळी भेट!

“…तर येणाऱ्या काळात मुलींमुळे मुलं बेरोजगार होतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More