महाराष्ट्र मुंबई

भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार- जयंत पाटील

मुंबई | भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत, उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे, लवकर निर्णय घेतला जाईल, असं जयंत पाटलांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना उशिरा मदत मिळत असल्याच्या मुद्द्यावरूनही जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारकडे आम्ही सतत मागणी केली असून, केंद्रानं पथक पाठवायला हवं. आता संकट सावरल्यावर टीम येते म्हणजे केंद्राचा राज्यांकडे पाहण्याचा दुजाभाव बदलला आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

संकट आल्यावर पवार साहेब केंद्रीय मंत्री असताना लगेच टीम यायची, राज्याला मदत मिळायची. आज मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते, विशेषतः महाराष्ट्राबाबत दुजाभाव करत आहेत, असंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“ओवैसीला विकत घेऊ शकेल असा अजुन कोणी जन्माला आलेला नाही”

“लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही आमचा विजय निश्चित”

कोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

“टू मच डेमोक्रॉसी”, म्हणत उर्मिला मातोंडकरांची मोदी सरकारवर जोरदार टीका

राज्य सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलाय- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या