बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यंदाच्या आयपीएलमधील सर्वात भन्नाट कॅच ; पाहा व्हिडीओ

गांधीनगर | आयपीएल हंगामातील 21 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने पंजाबवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. गोलंदाजांनी केलेल्या चकमदार कामगिरीमुळे आणि त्यानंतर कर्णधार इयान मॉर्गनने केलेल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर कोलकाताने विजय मिळवला आहे. सामना जरी पंजाब किंग्जने हारला असला तरी पंजाबच्या रवी बिश्नोईने भन्नाट झेेल पकडत सर्वांची मनं जिकंली आहे.

अर्शदीप सिंग त्याचं तिसरं षटक घेऊन आला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुनिल नारायणने मिड विकेटच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण रवी बिष्णोईने धावत येऊन चेंडूवर झडप टाकली. त्याच्या या झेलवर सर्वच थक्क झाले. त्याने 26 मीटरची धाव घेतली आणि चेंडू पकडला होता. 4 चेंडूमध्ये शून्य धावा करून सुनिल नारायण बाद झाला. पंजाबने हा सामना गमावला, पण पंजाबला या सामन्यात एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लाभला आहे.

मॉर्गनने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय घेतलेला सार्थ ठरवत कोलकाताच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा केला. यामध्ये प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्यासोबतच कमिन्स, सुनिल नारायण यांनी 2 तर शिमव मावी आणि वरूण चक्रवर्ती यांनी 1 गडी बाद करत पंजाबला 20 षटकात 9 बाद 123 धावा करता आल्या. फलंदाजीला आलेल्या कोलकाताचीही सुरूवात निराशाजनक झाली. राणा आणि गिल झटपट बाद झाले. त्यापाठोपाठ नारायणही बाद झाला.

दरम्यान, सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार असं वाटत असताना मॉर्गन आणि राहुल त्रिपाठीने भागीदारी रचली. त्यानंतर राहुल बाद झाला आणि लगेच रसेलही धावबाद झाला. शेवटी दिनेश कार्तिक आणि मॉर्गनने आक्रमक फटकेबाजी करत 17 व्या षटकात सामना जिंकला.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का?; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य

नगरसेविकेच्या मुलाला पुणे पोलिसांकडून अटक, कारण अत्यंत धक्कादायक

महाराष्ट्राने नोंदवला एका दिवसातील कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम

विश्वासाचं दुसरं नाव टाटा… देशवासियांना दिलेला शब्द चौथ्याच दिवशी पूर्ण केला!

कोलकाता आता आहे तय्यार! कोलकाताचा पंजाबवर 5 विकेट्सने विजय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More