‘या’ देशात वापरला जातो सर्वाधिक कंडोम; पाहा भारताचा क्रमांक कितवा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | कुटुंब नियोजन तसेच नको असलेल्या गर्भधारणेसाठी कंडोमचा (Condom) वापर केला जातो. जगाच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे जगभरात कुटुंब नियोजनाची साधने वापरणं गरजेचं आहे.सध्या अनेक कंपन्यांचे कंडोम बाजारात सहज उपलब्ध आहेत.

अनेक ठिकाणी कंडोमविषयी जनजागृती केली जाते. जगभरात कंडोमचा प्रचार करण्यासाठी सरकार (Government) संघटनेसोबत काम करत आहे. या प्रयत्नांचा चांगला परिणामही अनेक देशांमध्ये दिसून आला आहे. कंडोमच्या वापरात सर्वाधिक वाढ झाली आहे. हेच कंडोम वापरण्यात अनेक देश आघाडीवर आहेत.

हे सांगण अवघड आहे की कोणत्या देशात जास्त कंडोम वापरले जातात. मात्र, स्टेटिस्टाच्या सर्वेक्षणानुसार (According to a survey by Statista) 2021 मध्ये ब्राझील(Brazil) देश कंडोम वापरण्यात आघाडीवर आहे. तेथील लोकसंख्येपैकी 65 टक्के लोक कंडोम वापरतात. यानंतर दक्षिण आफ्रिका(South Africa), थायलंड आणि इंडोनेशियासारखे (Indonesia) देशदेखील कंडोम वापरण्यात आघाडीवर आहेत.

दुसरीकडे विक्रिच्या आधारे पहायला गेल्यास,चीनमध्ये (Chin) सर्वाधिक कंडोम विकले जातात. जास्त लोकसंख्येमुळं चीनमध्ये कंडोमची जगात सर्वाधिक विक्री होते. 2020 मध्ये चीनमध्ये सुमारे 2.3 अब्ज युनिट कंडोम विकले गेले आहेत. भारताची (India)लोकसंख्या जास्त असल्यामुळं भारतात कंडोमची बाजारपेठ मोठी आहे. मात्र,भारतात कंडोम वापरणाऱ्यांची टक्केवारी कमी आहे.

महत्त्वाच्या बातम्या