बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ वेळेमध्ये सर्वाधिक भारतीय पाहतात पॉर्न, ‘हे’ राज्य आहे पहिल्या स्थानावर!

नवी दिल्ली | गुगलच्या डेटामध्ये भारतीय मोठ्या संख्येने पॉर्न पाहत असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय कोणत्या वेळेस सर्वाधिक पॉर्नबाबत सर्च करतात याची आकडेवारीही समोर आली आहे. गुगल ट्रेंडवर गेल्या आठवड्याभराचा म्हणजेच 14 जुलै ते 21 जुलैदरम्यानचा डेटा पाहिला तर लक्षात येतं की पॉर्नबाबत सर्च करणाऱ्यांमध्ये भारतीयांंचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

भारतात रात्रीच्यावेळी जास्तीत जास्त सर्च करतात. यामध्ये रोज रात्री दीड वाजता सर्वाधिक सर्च झाल्याचं दिसून येतं. रात्री नऊ वाजल्यापासून पॉर्न सर्चबाबतचा ग्राफ वर जाऊ लागतो आणि दीड वाजता तो उच्चांक गाठतो. मात्र त्यानंतर पहाटे पाचपर्यंत पुन्हा खाली आल्याचं गुगल ट्रेंडमध्ये दिसून आलं आहे.

या ट्रेंडमध्ये देशातील पूर्वेकडील राज्यांचा समावेश आहे. यामध्ये मणिपूर, नागालँड, मिरोझाम, अरूणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांचा अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. त्या खालोखाल मेघालय, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरचा क्रमांक सर्वाधिक पॉर्न सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीत आहे.

दरम्यान, या यादीमध्ये महाराष्ट्र 26 व्या स्थानी आहे. महाराष्ट्राखालोखाल गोवा, दादरा नगर हवेली, केरळ आणि दिव दमण यांचाही अव्वल 30 मध्ये समावेश आहे.

थोडक्यात बातम्या- 

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“भारताला पाकिस्तान बनवण्यासाठी 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढवण्यात आली”

सचिन वाझे प्रकरणामुळे वाचला होता राज कुंद्रा; जाणून घ्या वाघे-कुंद्रा केस कनेक्शन!

‘दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या’; अजित पवार मुख्यमंंत्र्यांशी करणार चर्चा

जितेंद्र आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More